रेल्वे रुळाला तडे, मध्य रेल्वे विस्कळीत

रेल्वे रुळाला तडे, मध्य रेल्वे विस्कळीत

मध्य रेल्वेच्या मार्गावरील कुर्ला ते विद्याविहार या स्थानाकादरम्यान रेल्वे रुळाला तडे गेल्याने बुधवारी सकाळी या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. ऐन गर्दीच्या वेळेस वाहतूक विस्कळीत झाल्याने कामावार जाणा-या प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.

रेल्वे रुळाला तडे गेल्याने मुंबईच्या दिशेने जाणारी जलद मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. जलद लोकल मुलुंड-माटुंगा दरम्यान धीम्या मार्गावर वळविण्यात आल्या आहेत.

रेल्वे रुळाच्या दुरुस्तीचे काम सुरु असून लवकरच वाहतूक सुरळीत होईल असे रेल्वे अधिका-यांकडून सांगण्यात येत आहे.

गेल्या काही दिवसांपासून मध्य रेल्वेवर वाहतूक विस्कळीत होण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे प्रवाशांकडून संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *