चला हवा येऊ द्यामधील ‘हा’ कलाकार अडकणार विवाहबंधनात

चला हवा येऊ द्यामधील ‘हा’ कलाकार अडकणार विवाहबंधनात

झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकार हा खास आहे.

 प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांना भरभरून हसवलं आहे. यामधील कलाकार विनीत भोंडे. मूर्ती लहान पण किर्ती महान असलेल्या हा विनीत भोंडे लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे.  विनीतला आता त्याची साताजन्माची जोडीदार गवसली असून दोन दिवसांपूर्वीच त्याचा साखरपुडा झाला. मुळचा औरंगाबादच्या असलेल्या विनीतच्या भावी वधूचे नाव सोनम पवार आहे.

सोनम मुळची सोलापूरची असून औंरगाबाद येथे विनीतच्या घरी दोघांचा साखरपुडा झाला. अगदी घरगुती समारंभात दोघांनी रिंग एक्सचेंज केल्या. विनीत कधी हवालदार म्हणून तर कधी लहान मुलगा बनून प्रेक्षकांना पोट धरून हसवतो. आता हा अभिनेता लवकरच विवाह बंधनात अडकणा आहे.

विनीत आणि सोनम यांचे हे अरेंज्ड मॅरेज आहे. अलीकडेच दोघांच्या कुटुंबीयांची पसंती झाली आणि साखरपुडा करण्याचे निश्चित झाले. या घरगुती समारंभात झालेल्या साखरपुड्याला विनीत आणि सोनमच्या कुटुंबीयांसह काही जवळचे मित्र हजर होते. आता येत्या 4 मार्च रोजी औरंगाबाद येथे दोघांचा विवाहसोहळा पार पडणार आहे. मुळची सोलापुरची असलेली सोनम सध्या पुण्यात नर्सिंगचे शिक्षण घेत आहे.

विनीतने अभिनयाच्या क्षेत्रात गेल्या दहा वर्षांत उत्तम यश मिळवले आहे. मराठवाडा विद्यापीठातून नाट्यशास्त्रात विनीतने बी.ए. केले आहे. निशिकांत कामत यांच्या ‘डोंबिवली फास्ट’ या चित्रपटातून विनीतचा सुरु झालेला प्रवास आजही यशस्वीरित्या सुरु आहे. विनीतने आतापर्यंत शहाणपण देगा देवा, यल्लो, पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा, भिकारी यासारख्या सिनेमांत काम केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *