दहावीच्या विद्यार्थ्याची वर्गातल्याच मुलांनी केली हत्या

सोलापूरच्या माळशिरस शहरात दहावीच्या विद्यार्थ्याची त्याच्या वर्गातल्या मुलांनी हत्या केलीय.

महेश कारंडे असं मृत विद्यार्थ्याचं नाव आहे. काल सराव परीक्षेला गेलेला महेश कारंडे घरी परतला नाही. त्यामुळे शोधाशोध केल्यावर मृतदेह सापडला. त्याच्याबरोबर असलेली दोन मुलंही परीक्षेवरून घरी परतलेली नव्हती. त्यामुळे संशय बळावला होता.

मात्र, आता या दोन्ही मुलांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांनी गुन्हा कबूल केलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *