शिस्तप्रिय अधिकारी तुकाराम मुंढे यांची तडकाफडकी बदली

आपल्या तडफदार कामासाठी लोकप्रिय असलेले पीएमपीएमएलचे तुकाराम मुंढे यांची पुण्यातून बदली करण्यात आली आहे. पुण्यात त्यांनी शिस्तबद्ध कामाचा सपाटा लावला होता.

नाशिकला बदली

तुकाराम मुंढे यांची आता नाशिक महापालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आता पीएमपीएमएलमध्ये तुकाराम मुंढे यांच्या जागी नयना गुंडे यांनी नियुक्ती करण्यात आली आहे.

कठोर निर्णय

तोट्यात गेलेल्या पीएमपीएलला शिस्त लावण्यासाठी मुंढेंनी कठोर निर्णय घेतले होते. त्यामुळं त्यांच्यावर टीका झाली होती. तसंच त्यांनी घेतलेले अनेक निर्णय वादग्रस्त ठरले होते. त्यांच्या अनेक निर्णयांना नगरसेवकांनी तीव्र विरोध केला होता. मात्र मुंढेंनी आपला आपले निर्णय रेटून नेले. त्यामुळे त्यांच्याविरोधात नगरसेवकांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती. त्याचीच दखल घेत अखेर मुंढेंना वर्षभराच्या आतच पीएमपीएवरून हटवण्यात आल्याची चर्चा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *