स्कूल बसमधून जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. दिल्लीमध्ये 30 विद्यार्थ्यांना घेऊन शाळेत जाणारी स्कूल बस उलटून 12 विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत.
रुक्मिणी देवी आणि व्हिक्टोरिया गर्ल्स सिनिअर सेकंडरी स्कूलचे विद्यार्थी स्कूल बसमधून जात होते. यावेळी आयएसबीटी उड्डाणपुलाजवळ काश्मिरी गेट परिसरात बस उलटली.
बस उलटल्यामुळे 12 विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून त्यांना जवळच्या सुश्रुत ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं.

