पप्पा हा उल्लेख टाळायला हवा होता, विरोधकांच्या घोषणाबाजीवर पंकजा मुंडेंची भावनिक प्रतिक्रिया

पप्पा  हा उल्लेख टाळायला हवा होता, विरोधकांच्या घोषणाबाजीवर पंकजा मुंडेंची भावनिक प्रतिक्रिया

विरोधकांनी टीका करताना पप्पा हा उल्लेख टाळला असता, तर बर झालं असतं. कारण मी त्यांना गमावलं आहे, असं म्हणत महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी भावनिक प्रतिक्रिया दिली.

विधीमंडळाच्या अधिवेशानापूर्वी विरोधकांनी जॉनी, जॉनी एस पाप्पा, इटिंग चक्की एस पाप्पा असं म्हणत घोषणाबाजी केली होती. त्यावर आता पंकजा मुंडेंनी नाराजी व्यक्त केली.

206 कोटींच्या चिक्की खरेदी प्रकरणी घोटाळा झाल्याचा आरोप विरोधकांनी केला. तेव्हापासून त्यांच्यावर टीकेची झोड उठत आहे. आजही अधिवेशनात हा मुद्द गाजला.

“चिक्की वाले चिक्की, राजगिरा चिक्की, किंमत 206 कोटी”, “पंकजा मुंडे चिक्की चोर”, असा आक्रमक पवित्रा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला. मात्र आता पंकजा मुंडे या सर्व आरोपांना तोंड देताना, विरोधकांनी ‘पप्पा’ हा उल्लेख टाळायला हवं होतं, असा भावनिक मुद्दा उपस्थित करत आहेत.

याशिवाय कोणत्याही आरोपांना पुराव्यासह उत्तर द्यायला तयार आहे. तसंच सरकार अडचणीत नसल्याचा दावा, पंकजा यांनी केला. विरोधकांकडे मुद्दे नसल्याने आरोप करत आहेत. त्यांच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणावरून लक्ष हटवण्यासाठी आमच्यावर आरोप करत आहेत, असंही पंकजा म्हणाल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *