अच्छे दिन’साठी 5 वर्ष नाही, 25 वर्षे लागतील: भाजपाध्यक्ष अमित शाह

अच्छे दिन’साठी 5 वर्ष नाही,  25 वर्षे लागतील: भाजपाध्यक्ष अमित शाह

‘अच्छे दिन यायला 5 नाही तर 25 वर्ष लागलीत.’ असं खुद्द भाजपाध्यक्ष अमित शाह यांनीच म्हटल्यानं अऩेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. भोपाळमध्ये एका कार्यक्रमानिमित्त ते बोलत होते.

विशेष म्हणजे  इंग्रज राजवटीच्या आधीचा काळ देशाच्या वाट्याला पुन्हा आणणं. हेच खरं अच्छे दिनाचं आश्वासन होतं. असंही शाह आवर्जून म्हणाले. त्यामुळे सत्तेत आल्यानंतर भाजप आपल्या आश्वासनांना बगल देतंय का? असाही प्रश्नही पडू लागला आहे.

‘येत्या पाच वर्षात अर्थ, परराष्ट्र, सुरक्षा, रोजगार यांच्या धोरणात योग्य बदल भाजप घडवेल.मात्र, जगात भारताला सर्वश्रेष्ठ बनवायचं असेल. देशाचे अच्छे दिन आणायचे असतील. तर त्यासाठी 25 वर्ष हवीत. शिवाय त्याचसोबत पंचायत ते संसदेपर्यंत भाजपची भरभराट व्हायला हवी.’ असंही शाह यांनी म्हटलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *