नात्याला काळीमा! मुलीबरोबर खेळतो सांगून भावाने आठ महिन्याच्या चिमुरडीवर केला बलात्कार

आठ महिन्याच्या चिमुरडीचं लैंगिक शोषण झाल्याची घटना समोर आली आहे. या आठ महिन्याच्या चिमुरडीवर तिच्या 28 वर्षीय चुलत भावाने बलात्कार  केल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली. या प्रकरणी पीडित मुलीच्या भावाला अटक करण्यात आली आहे. चिमुरडीची आई रविवारी रात्री कामावरून परतल्यावर तिला या घटनेची माहिती मिळाली. जखमी अवस्थेत मुलीला जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं असून तिला सध्या व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. पीडित चिमुरडीचं कुटुंबीय शकूरपूर वस्तीमध्ये राहते. तिचे वडील मजूर असून आई इतर घरी धुणं-भांड्यांची काम करते.

पोलीस सुत्रांच्या माहितीनुसार, रविवारी मुलीची आई तिला नातेवाईंकांकडे सोडून कामावर गेली. काहीवेळाने मुलीचे वडिलही कामावर गेले. संध्याकाळी उशिरा कामावरून आल्यावर चिमुरडी सतत रडताना आईला दिसती. तसंच तिच्या प्रायव्हेट भागातून ब्लीडिंगही होतं होतं. आरोपीने मुलीबरोबर खेळण्याचं नाटक करून तिला वरच्या मजल्यावर नेलं व तेथे तिच्यावर बलात्कार केला. या घटनेत सगळ्यात अमानुष म्हणजे आरोपीने चिमुरडीच्या रडण्याचा आवाज कुणाला येऊ नये म्हणून तिचं तोंड दाबून ठेवलं होतं.

पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यावर झालेल्या तपासणीत सुरूवातीला आरोपीने गुन्हा कबूल केला नाही आणि नंतर तो फरार झाला. आरोपी फरार झाल्यानंतर पोलिसांचा संशय बळावला व त्यांनी त्याचा शोध घेत आरोपीला अटक केली. पीडित चिमुरडीची प्रकृती नाजूक असून तिला व्हेटिंलेटरवर ठेवण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *