मुंबईतील व्यावसायिकावर झीनत अमान यांना धमकावण्याचा आरोप

ज्येष्ठ अभिनेत्री झीनत अमान यांनी मुंबईस्थित एका व्य्वसायिकावर आपल्याला धकावण्याचा आणि गैरवर्तन केल्याचा आरोप करत जुहू पोलिसांत त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. सोमवारी त्यांनी याप्रकरणातील तक्रार दाखल केली. आरोपीवर भारतीय दंडसंविधानाच्या कलम ३०४ ड (पाठलाग करणे) आणि कलम ५०९ (महिलेला अपमानास्पद वागणूक देणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेल्या काही काळापासून झीनत अमान आणि तो व्यावसायिक एकमेकांना ओळखत होते. पण, त्यानंतर काही कारणांमुळे झीनत यांनी त्याच्याशी बोलणे थांबवले. ज्यामुळे तो व्यावसायिक सतत झीनत यांच्याशी संपर्क साधण्याचा आणि त्यांचा पाठलाग प्रयत्न करत होता. आरोपीने झीनत अमान यांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर अनेक अश्लील मेसेज पाठवले असून, काही दिवसांपूर्वी त्याने झीनत यांच्या घरात घुसून गैरवर्तन करत तेथे असणाऱ्या सुरक्षा रक्षकाला मारहाण केल्याचेही वृत्त आहे.

दरम्यान, सततच्या धमकावणाऱ्या आणि पाठलाग करणाऱ्या त्या व्यावसायिकाला ताकीद देऊनही काहीच उपयोग न झाल्यामुळे अखेर झीनत अमान यांनी पोलिसांची मदत घेण्याचा निर्णय घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *