शिवनेरी बसच्या डिक्कीच्या दाराचा फटका, २ ठार

शिवनेरी बसच्या डिक्कीच्या उघड्या दरवाजाची धडक बसून रस्त्याच्या कडेला थांबलेल्या दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. खडकी परिसरात हा विचित्र अपघात झाला.

बसच्या उघड्या डिक्कीच्या दरवाजा

पुण्याहून दादरकडे निघालेल्या शिवनेरी बसच्या उघड्या डिक्कीच्या दरवाजाचा पत्रा या दोघांच्याही छातीत घुसला. या घटनेत दीपक सोरटे आणि जॉर्ज या दोघांचा मृत्यू झाला. तर आरोग्यदास स्वामी नावाची व्यक्ती जखमी झाली.

चालकाचा बेजबाबदारपणा कारणीभूत

या अपघाताला शिवनेरी चालकाचा बेजबाबदारपणा कारणीभूत असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. बसचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *