ट्रकच्या धडकेत विद्यार्थ्याचा मृत्यू

मोटारसायकलवरील तोल जाऊन रस्त्यावर पडलेल्या विद्यार्थ्याला मागून आलेल्या ट्रकने धडक दिल्याने नववीच्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला, तर रस्त्यालगत पडलेला दुसरा विद्यार्थी किरकोळ जखमी झाल्याची घटना सोमवारी सकाळी मुंबई-नाशिक महामार्गावर घडली.

दहागांव (देसले पाडा) येथे राहणारे मनीष देसले (१५) आणि प्रणव गायकवाड (१५) हे दोघे मोटारसायकलवरून शाळेत जात होते. खातिवली येथे पेट्रोल भरण्यासाठी जात असताना ताडोबा मंदिरासमोरच त्यांचे मोटारसायकलवरील नियंत्रण सुटले आणि मोटारसायकल रस्त्यावर पडली. त्याचवेळी पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकखाली सापडून मनीषचा जागीच त्यू झाला, तर प्रणव रस्त्यालगत पडून जखमी झाला. दोघेही विद्यार्थी वासिंदच्या सरस्वती विद्यालय येथे नववीमध्ये शिकत होते. याबाबत वासिंद पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद झाली असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *