अभिनेता विकास समुद्रेला ब्रेन हॅमरेज; प्रकृती गंभीर

लोकप्रिय विनोदी कार्यक्रम ‘फू बाई फू’च्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला विनोदवीर विकास समुद्रे याला ब्रेन हॅमरेज झाले असून त्याची प्रकृती गंभीर आहे. त्याच्यावर मीरा रोड येथील भक्ती वेदांत रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

गेल्या काही दिवसांपासून विकासला डोकेदुखीचा त्रास जाणवत होता. परंतु, हा त्रास जास्त वाढल्याने त्याला रुग्णालात दाखल करण्यात आले. तात्काळ त्याच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली आहे.

विकासची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे पुढील उपचार करायचे कसे, असा प्रश्न कुटुंबीय आणि मित्रांपुढे उभा राहिला आहे. विकासच्या उपचारासाठी विविध संस्था आणि नाट्य-सिनेसृष्टीतील लोकांनी मदतीसाठी पुढे यावं, असं आवाहनदेखील त्याचा कुटुंबीयांकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *