हृतिक ठरला जगातील सर्वात ‘हॅण्डसम अॅक्टर’

अभिनेता हृतिक रोशनचा ‘क्रिश ४’ लवकरच प्रदर्शित होणार या बातमीने त्याचे चाहते खूश असताना, त्यांच्यासाठी आनंदाची आणखी एक बातमी आहे. जगातील सर्वात ‘हॅण्डसम अॅक्टर’ म्हणून हृतिकची निवड झालीय. या स्पर्धेत त्याने केवळ बॉलिवूडच नव्हे तर हॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्यांनादेखील मागे टाकलंय.

‘ग्रीक गॉड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हृतिकच्या लूकची क्रेझ भारताबाहेरही तितकीच आहे. त्यामुळे, ‘वर्ल्ड्स टॉप मोस्ट डॉट कॉम’ ने प्रसिद्ध केलेल्या ‘हॅण्डसम अॅक्टर’ पुरस्कारांच्या
यादीत हृतिक रोशन पहिल्या क्रमांकावर आहे. या यादीत हृतिकने बॉलिवूडचा दबंग सलमान खानलादेखील मागे टाकलंय. सलमानचे नाव या यादीत ५ व्या क्रमांकावर आहे.

हृतिकने ‘हॅण्डसम अॅक्टर’ चा किताब जिंकून ब्रॅड पिट, रॉबर्ट पॅटिन्सन, क्रिस इवांस, टॉम हिडलस्टन या प्रसिद्ध अभिनेत्यांना मागे टाकले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *