मुंबईत पुन्हा आगीचे थैमान, डॉकयार्ड रोड येथील वर्कशॉपला आग

कमला मिल येथील आगीच्या घटनेनंतर मुंबईतील आगीच्या घटना थांबायचे नाव घेत नाहीयेत. डॉकयार्ड रोड येथील जमेरिया इमारतीमधील लोखंडाच्या वर्कशॉपला रात्री भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

काही वेळातच अग्निशमन दलाकडून आग विझवण्यात आल्याचे समजते. या घटनेबद्दल मिळालेल्या माहितीनुसार, जमेरिया इमारतीमधील लोखंडाच्या वर्कशॉपला रात्री सव्वा बाराच्या सुमारास आग लागली. परंतु आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.

सोमवारी सकाळी मुंबई सत्र न्यायालयात आग लागली होती. त्याआधीही काही ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या. मुंबई – लोअर परळ येथील कमला मिल कम्पाउंडमध्ये लागलेल्या आगीची घटना ताजी असतानाच इमारतीमधील गोदामाला लागलेल्या आगीमुळे परिसरात भीतीचे वातावरण परसले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *