मॉर्निंग वॉकला गेलेल्या दोघांना कारने चिरडले

मुरबाड-सरळगाव रस्त्यावर मॉर्निंग वॉकला गेलेल्या दोघांना एका कारने उडवले. या अपघातात दोघांचाही मृत्यू झाला. आज सकाळी ६.४० वाजताच्या सुमारास ही घटना घडली. मृत व्यक्ती निवृत्त शिक्षक आहेत, अशी माहिती समोर आली आहे.

पांडुरंग सिताफराव, रामचंद्र पारधी अशी मृतांची नावे आहेत. हे दोघे सकाळी मुरबाड-सरळगाव रस्त्यावर मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. सकाळी ६.४० वाजताच्या सुमारास एका कारने त्यांना जोरदार धडक दिली. त्यात दोघांचाही मृत्यू झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *