मुंबई सत्र न्यायालयाच्या परिसरात आग

कर्मवीर भाऊराव मार्गावर असलेल्या मुंबई सत्र न्यायालयाच्या परिसरात आज सकाळी आग लागली. सत्र न्यायालयाच्या तिसऱ्या मजल्यावर सकाळी साडेसातच्या सुमारास आग लागल्याचं सांगण्यात येतंय. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ५ गाड्या आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. प्राथमिक माहितीनुसार सध्यातरी कुठलेही जीवितहानीचे वृत्त नाही. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *