हनीप्रीतच्या आईकडून राखीला ५ कोटींची नोटीस, ३० दिवसात वाढणार अडचणी

काही दिवसांपूर्वी हनीप्रीत आणि राम रहीमबद्दल केलेल्या वक्तव्याबाबत बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंतच्या अडचणी वाढू शकतात. कारण हनीप्रीतची आई आशा तनेजाने राखी सावंतला ५ कोटींची नोटीस पाठवली आहे.

५ कोटींची नोटीस

तुरूंगात असलेल्या हनीप्रीतची आई आशा तनेजाने राखी सावंतला नोटीस पाठवली आहे. त्यांचा वकील मोमिन मलिक याने ही नोटीस पाठवली आहे. त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, राखी सावंतने ३० दिवसात माफी मागावी नाहीतर त्या गुन्हा दाखल करतील.

काय म्हणाली होती राखी?

राखी सावंतने एका वृत्तवाहिनीवर सांगितले होते की, चार वर्षांआधी तिची राम रहीम आणि हरीप्रीतसोबत ओळख झाली होती. राम रहीमसोबत अनेकदा भेटही झाली होती. त्याने राजकारणात जाण्याचा सल्लाही दिला होता. राखी म्हणाली होती की, राम रहीम तिला सिरसा येथे घेऊन गेला होता. तेथील गुहेतही घेऊन गेला होता. राम रहीमने तिला वाढदिवशी डे-यात बोलवले होते. तिथेच तिच्यातील आणि राम रहीममधील जवळीक पाहून हनीप्रीत घाबरली होती, असे राखी म्हणाली होती.

हनीप्रीत आणि राम रहीमवर राखीचा सिनेमा

राखी सावंत हनीप्रीत आणि राम रहीमवर सिनेमा करत आहे. या सिनेमात राखी हनीप्रीतचा आणि संजय नेगी राम रहीमचा रोल साकारणार आहे. या सिनेमाची निर्मितीही राखी सावंत आणि तिचा भाऊ राकेश सावंतने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *