‘व्हॉटसअप’मुळे अपहृत अल्पवयीन मुलीची सुटका

श्रीरामपूर तालुक्यातील खानापूर गावातून अपहरण केलेल्या मुलीची पोलिसांनी सुखरुप सुटका केलीय.

अवघ्या आठ वर्षांच्या मुलीचे १ जानेवारी रोजी अपहरण झाले होते. मुलगी शाळेतून घरी न आल्याने ती हरवल्याची माहिती सोशल मीडियावर वायरल करण्यात आली होती.

आरोपीनं अपहृत मुलीला पनवेल इथल्या आयटीआयमध्ये नेलं होतं. इथं व्हॉटसअप पोस्टमुळे एका शिक्षकानं मुलीला ओळखलं… आणि पोलिसांच्या मदतीनं तिची सुटका केली.

पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केलीय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *