झंडू कुमारने कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताला मिळवून दिलं पहिलं मेडल

भारताने कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये आपलं खातं उघडलं आहे. भारतीय पॅरा पॉवरलिफ्टर झंडू कुमारने ग्लासगोमध्ये पुरुषांच्या हेवीवेट कॅटेगरीमध्ये ब्रॉन्झ मेडल जिंकलं आहे. नायजेरियाचा रिलुवान इदरीसने शेवटच्या प्रयत्नात 212 किलो वजन उचलण्यात अयशस्वी झाला त्यामुळे झंडू कुमारचं मेडल पक्कं झालं. हे यंदाच्या कॉमनवेल्थ गेम्स 2026 स्पर्धेतील भारताचं पहिलं मेडल आहे.

ई – रिक्षा चालवणाऱ्याने देशाची मान उंचावली :

शनिवारी बिहारच्या  29 वर्षीय झंडू कुमार यांनी पुरुषांच्या हेवीवेट पॅरा पॉवर लिफ्टिंग इव्हेन्टमध्ये ब्रॉन्झ मेडल जिंकलं. दिवसाच्या सुरुवातीला पुरुषांच्या ‘लाइटवेट’ प्रकारात चौथ्या स्थानावर राहिल्यामुळे आलेल्या निराशाजनक अनुभवानंतर, झंडू कुमारने जागतिक दर्जाच्या वेटलिफ्टर्सचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत शानदार कामगिरी करत त्या निराशेचे रूपांतर आनंदोत्सवात केले. 29 वर्षीय झंडू कुमारने दमदार कामगिरीसह आपल्या मोहिमेची सुरुवात केली. त्याने दुसऱ्या प्रयत्नात 190 किलो वजन यशस्वीपणे उचलले. मात्र ही कामगिरी त्याच्या वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरीपेक्षा 8 किलोने कमी होती. 29 वर्षीय झंडू कुमार जो आधी ई – रिक्षा चालवायचा आणि त्याचे वडील रस्त्यावर भाजी विकायचे, मात्र त्याने भारतासाठी मेडल जिंकून कुटुंबाची आणि देशवासीयांची मान उंचावली आहे.

झंडू कुमारने केलं जबरदस्त पुनरागमन : 

हे भारताचे पहिले पदक आहे. दिवसाच्या सुरुवातीला पुरुषांच्या ‘लाइटवेट’ प्रकारात चौथ्या स्थानावर राहिल्यामुळे आलेल्या निराशाजनक अनुभवानंतर, जागतिक दर्जाच्या वेटलिफ्टर्सचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत झंडू कुमारने आपल्या शानदार कामगिरीच्या जोरावर त्या निराशेचे रूपांतर आनंदात केले. 29 वर्षीय झंडू कुमारने दमदार कामगिरीसह आपल्या मोहिमेची सुरुवात केली. त्याने दुसऱ्या प्रयत्नात 190 किलो वजन यशस्वीपणे उचलले. मात्र ही कामगिरी त्याच्या वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरीपेक्षा 8 किलोने कमी होती.

पॅरा पाॅवारलिफ्टर झंडू कुमारने त्याच्या शेवटच्या अटेंप्टमध्ये 196 किलोचं वजन उचलून जबरदस्त कामगिरी केली. पण तो खूपच कमी अंतराने मागे पडला. असे असूनही 190 किलो वजनाच्या त्याच्या कामगिरीने त्याला आधीच एका मजबूत स्थितीत आणले होते.

कोणी जिंकलं गोल्ड मेडल?

नायजेरियाच्या रिलुवान इदरीसने 208 किलोच्या आपल्या बेस्ट लिफ्ट सोबत 132.8 पॉइंट्स मिळवले आणि गोल्ड मेडल पटकवले. तर इंग्लंडच्या मॅथ्यू हार्डिंगने 199 किलोच्या लिफ्ट सोबत 131.0 पॉइंट्स मिळवून सिल्व्हर मेडल जिंकलं आहे. तो भारतीय खेळाडूच्या अगदी थोड्या फरकाने पुढे होता. दरम्यान, झांडू कुमारने तिसरे स्थान टिकवून ठेवले आणि 130.9 गुणांसह ब्रॉन्झ पदक जिंकले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *