ग्रामस्थांकडून एसटीचा वाढदिवस साजरा

घटती प्रवाश्यांची संख्या आणि महामंडळाला होणारा तोटा हि एक चिंतेची बाब असली तरी, ग्रामिण भागात आजही एसटी बसशी जोडलेला प्रवाश्यांचा जिव्हाळा कायम आहे. अलिबाग तालुक्यातील सांबरी गावातील लोकांनी हाच रुणानुबंध जपत गावात आलेल्या एसटी बसचा वाढ दिवस साजरा केला.

सांबरी..अलिबाग तालुक्यातील शेवटच्या टोकावरच गाव, जिथे रस्ते वीज पाणी यासारख्या मुलभुत सुविधांची वानवा होती. वाहतुकींची संसाधनंही नव्हती. अशा काळात गावातील कामानिमीत्याने मुंबईत स्थायिक झालेल्या लोकांच्या सोयीसाठी एस टी महामंडळाने सांबरी ते परळ ही बससेवा सुरु केली.

आज या घटनेला तब्बल २५ वर्ष पुर्ण झाली. एसटी महामंडळाने सांबरी ते परळ ही बससेवा अव्याहतपणे आहे. आज गावात चांगले रस्ते आहेत, वाहतुकीची नवीन साधनेही आहेत. पण गावकरम्य़ांचे एसटीच्या बससेवेशी जोडले गेलेले रुणानुबंध कायम आहेत. याचीच जाण ठेऊन, गावकऱ्यांनी एकत्र येत आज एसटीचा २५ वा वाढदिवस साजरा केला.

सांबरीतील ग्रामस्थ दुपारपासूनच एस. टी. ची वाट पहात बसले होते . गावात गाडी येताच ग्रामस्थां नी हारफुले तोरण बांधून तिची सजावट केली. सुवासिनींनी ओवाळून बसची विधीवत पुजा केली. एसटीचे चालक आणि वाहक यांचाही सत्कार केला. यानंतर स्थानिक जिल्हा  परीषद सदस्याय चित्रा पाटील यांच्यात हस्ते  केक कापण्याोत आला. आमदार सुभाष पाटील यांनी हिरवा झेडा दाखवून लाडक्या एसटीला मुंबईकडे रवाना केले. या अनोख्या वाढदिवसासाठी गावातील अबालवृध्द जमले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *