भीमा कोरेगाव येथे भीम अनुयायांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध म्हणून आज महाराष्ट्र बंद ठेवण्यात आला आहे. या बंदमुळे मुंबई विद्यापीठांशी संबंधीत अनेक महाविद्यालयांमधील परीक्षा रद्द करण्यात आलेल्या नाहीयेत. परीक्षा सुरूच राहणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
विद्यार्थ्यांना जादा वेळ
मुंबई विद्यापीठाशी संबंधित महाविद्यालयांमध्ये सुरू असलेल्या परीक्षांमध्ये उशिरा आलेल्या विद्यार्थ्याना तेवढाच जादा वेळ वाढवून देण्याबाबत परवानगी देण्यात आली आहे. मुंबई विद्यापीठामध्ये विविध ठिकाणी सकाळी ११ आणि ३ अशा दोन सत्रात विविध परीक्षा सुरू आहेत.
उशिरा येण्याची मुभा
महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर विध्यार्थ्याना परीक्षेसाठी उशीर होण्याची शक्यता आहे. तेव्हा एक तासापर्यंत उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्याना तेवढीच वेळ वाढवून देण्याची परवानगी विद्यापीठाने महाविद्यालयांना दिली आहे.
