उल्हासनगरच्या शासकीय रूग्णालयातल्या डॉक्टरवर 25 वर्षीय तरूणीचा विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. उल्हास वाघ असं या डॉक्टरचं नाव आहे.
पिडीत तरुणीला दात दुखण्याचा त्रास व्हायला लागल्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र आरोपी डॉक्टरनं तिला बेशुद्ध करून तिचा विनयभंग केल्याचा आरोप तरूणीनं केला.
विनयभंग झाल्याची जाणीव झाल्यानंतर तिनं थेट पोलीस ठाणे गाठलं आणि घडलेल्या प्रकाराची तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. मात्र, या घटनेमुळे महिला रूग्णांनी डॉक्टरांवर किती भरवसा ठेवावा असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

