व्हॉट्सअॅपवर परपुरुषाशी सतत गप्पा मारत असल्याच्या संशयावरून आरोपी पती राजेश शर्मा (३८) याचे पत्नी सरीताशी (३४) भांडण झाले. पत्नीने वाद घालण्यास सुरुवात केल्यानंतर रागाच्या भरात राजेशने तीच्या डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला केला. जखमेतून अती रक्तस्त्राव झाल्याने सरिताचा जागीच मृत्यू झाला. जोडप्याला दोन मुलं आहे. पण ही मुले घरी नसताना हा प्रकार घडला, अशी माहिती पोलिसांनी दिली.
मागील १४ वर्षापासून मंगलहाट परिसरातील बिर्बन कॉलीनीमध्ये संसार करीत असलेल्या राजेश आणि सरितामध्ये मोबाइल चॅट करण्यावरून आणि विवाहबाह्य संबंधाच्या संक्षयावरून मागील काही दिवसापासून खटके उडत होते. मागील काही दिवसांपासून सरिताला सतत फोनवर चॅटिंग करताना पाहून राजेश अस्वस्थ झाला होता. प्रत्येक वेळी सरिताने फोन हातात घेतल्यावर तु कोणाशी एवढ्या गप्पा मारतेस हा प्रश्न तो विचारत असे. सरिता त्या प्रश्नांकडे दूर्लक्ष करीत असे. मात्र परवा संध्याकाळी सरिता फोनवर चॅट करत असताना राजेशने तिचा फोन हिसकावून घेतला असता नवरा बायकोमध्ये हुज्जत झाली. त्यातच राजेशने सरिताच्या डोक्यात रॉडने हल्ला केला. लोखंडी रॉडचा जोरदार प्रहार झाल्याने सरिताचा जागीच मृत्यू झाला, असं पोलिस निरिक्षक आर. श्रीनिवास यांनी सांगितलं.

