उरणजवळील जेएनपीटी बंदरात ५० किलो सोने जप्त केले आहे. एसीच्या कंटेनरमध्ये हे सोने लपवले होते. सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई करून सोनेतस्करीचा डाव उधळला.
सिंगापूरहून समुद्रमार्गे मुंबईत सोने आणण्यात येत होते. सीमाशुल्क विभागाने सोन्याची तस्करी करणाऱ्यांचा डाव हाणून पाडला. जेएनपीटी बंदरात एसीच्या कंटेनरमध्ये लपवून ठेवलेले तब्बल ५० किलो सोने अधिकाऱ्यांनी जप्त केले आहे. या सोन्याची किंमत सध्याच्या बाजारभावानुसार अंदाजे ५० कोटी रुपयांच्या घरात असल्याचे सांगण्यात येते.
