मुंबईत बंद फ्लॅटमध्ये सापडला प्रसिद्ध महिला डॉक्टरचा मृतदेह

अंधेरीमध्ये घरात एका महिला डॉक्टरचा मृतदेह सापडल्याने आजुबाजुच्या परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पूनम सातपुते असं या महिला डॉक्टरचं नाव आहे. अंधेरी वेस्टमध्ये राहणाऱ्या या महिला डॉक्टरचा त्यांच्याच फ्लॅटमध्ये मृतदेह सापडला आहे. फ्लॅटचा दरवाजा आतून बंद होता. मृतदेहाची स्थिती पाहता पूनम यांचा मृत्यू ३ ते ४ दिवसांपूर्वी झाल्याचा डॉक्टरांचा अंदाज आहे. मृत्यू का झाला हे मेडिकल रिपोर्ट नंतर कळेल. अंबोली पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत.

४५ वर्षीय पूनम सतपुते हे प्रसिद्ध डॉक्टर आहेत. अनेक वर्षांपासून त्या फ्लॅटमध्ये ते एकट्या राहत होत्या. मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार त्या डायबिटीज पेशंट होत्या.

मंगळवारी रात्री शेजारच्या व्यक्तींनी अंबोली पोलिसांना फोन करुन माहिती दिली. पूनम यांच्या घरातून दुगंर्ध येऊ लागल्याने पोलिसांनी याबाबत माहिती देण्यात आली. पोलिसांनी जेव्हा घरात ऐन्ट्री केली तेव्हा त्यांचा मृतदेह हा त्यांच्या बेडवर होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *