बंदोबस्तावर असलेल्या महिला पोलिसाच्या हाताला जमावात चावा

पालिका कारवाईवेळी बंदोबस्तावर असलेल्या एका महिला पोलीस शिपायाच्या हाताला चावा घेण्याचा प्रकार घडला आहे. सांताक्रूझ येथे घडलेल्या प्रकाराबद्धल बीकेसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

प्राप्त माहितीनुसार, सांताक्रूझ येथे मुंबई महापालिकेकडून कारवाई सुरू होती. या वेळी कारवाईला विरोध करत जमाव आक्रमक झाला. आक्रमक जमावाला पोलिसांनी रोखून धरले. यावेळी  संतप्त जामावाने पोलिसांना धक्काबुक्की केली. या जमावातील एका महिलेने महीला पोलिसाच्या हाताला कडकडून चावा घेतला.

स्वाती तोडकर असेल महिलेच्या चाव्यात जखमी जालेल्या महिला पोलीस शिपायाचे नाव आहे. सांताक्रूझ पूर्वेतील हंस भुग्रा मार्गावरील आंबेडकरनगर झोपडपट्टी विरोधाक अतिक्रमन विभाग कारवाई करत होता. या वेळी लावण्यात आलेल्या पोलीस बंदोबस्तात स्वाती तोडकर यांचाही समावेश होता.

दरम्यान, पोलिसांनी तोडकर यांच्या हाताला चावा घेणाऱ्या चावेबाज महिलेला ताब्यात घेतले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *