कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी रेल्वे सज्ज, ‘गणपती विशेष’ ट्रेनचं आरक्षण 12 जुलैपासून

कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी रेल्वे सज्ज, ‘गणपती विशेष’ ट्रेनचं आरक्षण 12 जुलैपासून

गणेश उत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मध्य रेल्वेकडून 60 विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेने परिपत्रक जारी करुन याबाबतची माहिती दिली.

या सर्व विशेष ट्रेनचं आरक्षण प्रवासाच्या 60 दिवसांपूर्वी करणं आवश्यक आहे. या सर्व आरक्षित विशेष ट्रेन असून त्यांचं भाडंही जास्त असेल.

01001/01002 सीएसटी-मडगाव-सीएसटी ट्रेन गुरुवार वगळता 11 ते 29 सप्टेंबरपर्यंत आठवड्यातील सहा दिवस धावणार आहे. सीएसटीहून रात्री 12 वाजता निघणारी ट्रेन मडगावला त्याच दिवशी दुपारी 2.10 मिनिटांनी पोहोचेल. तर मडगाववरुन दुपारी 2.40 मिनिटांनी सुटणारी ट्रेन दुसऱ्या दिवशी पहाटे 4.25 वाजता सीएसटीला पोहोचेल.

तर 01033/01034 सीएसटी-मडगाव-सीएसटी ही ट्रेन 10 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबरदरम्यान दर गुरुवारी सोडण्यात येईल. ही ट्रेन दर गुरुवारी रात्री 12.20 मिनिटांनी सीएसटीहून सुटेल आणि दुपारी 2.10 मिनिटांनी मडगावला पोहोचेल. तर मडगावहून दर गुरुवारी 3.25 मिनिटांनी सुटणारी ट्रेन दुसऱ्या दिवशी पहाटे 4.25 ला सीएसटीला पोहोचेल.

तसंच 01095/01096 दादर – सावंतवाडी – दादर ही ट्रेन 11 सप्टेंबर ते 29 सप्टेंबरदरम्यान आठवड्यातील रविवार, मंगळवार आणि शुक्रवार हे तीन दिवस धावणार आहे. 01095 ही विशेष ट्रेन दादरहून सकाळी 7.50 ला सुटेल आणि सावंतवाडीला रात्री 8.30 मिनिटांनी पोहोचेल. तर 01096 ही ट्रेन सावंतवाडीहून सोमवार, बुधवार आणि शनिवारी पहाटे 4.50 मिनिटांनी सुटेल आणि दादरला दुपारी 3.50 मिनिटांनी पोहोचेल.

आरक्षण कधी सुरु होणार?

 

– 10 सप्टेंबरला धावणाऱ्या 01033/01034 या ट्रेनचं आरक्षण 12 जुलैपासून सुरु होईल.

– 11 सप्टेंबरला सुटणाऱ्या 01001/01002, 01095  या विशेष ट्रेनचं आरक्षण 13 जुलैपासून सुरु होणार आहे.

– तर 12 सप्टेंबरला सुटणाऱ्या 01096 ट्रेनचं आरक्षण 14 जुलैपासून सुरु होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *