बलात्कारातील आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी रचलेला सापळा पोलिसांच्या अंगलट आला. अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी चक्क पिडीत मुलीचाच वापर केला. पण मोक्याच्या क्षणी पोलिसांनी दाखवलेल्या निष्काळजीपणामुळे पिडीत मुलीवर पुन्हा अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
जालन्यातील नाव्हा रोड परिसरात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला. आरोपींनी मुलीला धमकावून तिचा मोबाईल घेऊन ठिकाणाहून पळ काढला. पिडीत मुलीने पोलिस स्थानकात दाखल केलेल्या तक्रारीवरुन दोन आरोपींविरोधात गुन्हाही नोंदवण्यात आला. पण आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी पिडीत तरुणीच्या मोबाईलवर फोन करुन सापळा रचला आणि फोन घेण्यासाठी तरुणीलाच आरोपींकडे पाठवलं आणि नेमकं याचं वेळी आरोपीने पोलिसांना गुंगारा देऊन मुलीवर पुन्हा अत्याचार केला.
या प्रकरणात आरोपीला पोलिसांनी अटक केली असली तरीही गुन्हेगाराला पकडण्यासाठी पोलिस वापरत असलेल्या भयंकर पद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. दरम्यान या तपासातील सहाय्यक पोलिस निरीक्षकाला निलंबित करण्यात आलं आहे.

