आसाराम बापू प्रकरणातील साक्षीदारावर गोळीबार

स्वयंघोषित गुरु आसाराम बापू प्रकरणातील एका साक्षीदारावर दोन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला. यात तो साक्षीदार गंभीर जखमी झाला आहे.

शरांजपूर जिल्ह्यातील पुवायन भागात ही घटना घडली. बापू प्रकरणातील साक्षीदार कृपाल सिंग शुक्रवारी रात्री घरी परतत असताना त्याच्यावर मोटरसायकलवरुन जाणा-या दोन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला.

या गोळीबारात कृपाल सिंग गंभीर जखमी झाला असून त्याला बरैलीमधील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून धमक्यांचे फोन येत होते असा आरोप सिंग यांनी केल्याची माहिती अतिरिक्त शहर दंडाधिका-यांनी दिली.

सिंग हे एका ट्रान्सपोर्ट कंपनीत काम करतात. त्यांच्या मुलीने आसाराम बापू विरोधात लैगिंक छळाचा गुन्हाही दाखल केला आहे.

यापूर्वी जानेवारीमध्ये आसाराम प्रकरणातील एका साक्षीदाराची मुझ्झफरनगरमध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *