गो एअरवेजच्या विमानाला एरोब्रिजची धडक

गो एअरवेजच्या विमानाला एरोब्रिजची धडक

मुंबईहून पोर्ट ब्लेअरला जाणाऱ्या विमानाला चेन्नई विमानतळावर एरोब्रीज धडकलं. यामुळे विमानाच्या काही भागाचं नुकसान झालं. दुपारच्या सुमारास ही घटना घडली. पण या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. विमानातील सर्व १६८ प्रवासी सुखरूप आहेत.

मुंबई ते पोर्ट ब्लेअर व्हाया चेन्नई हे विमान दुपारी चेन्नई विमानतळावर उतरलं. उतरल्यानंतर विमानाच्या दाराला एरोब्रीजचा जोरदार धडक बसली. यामुळे विमानाच्या दाराचं मोठं नुकसान झालं. या घटनेवेळी विमानात १६८ प्रवासी होते. घटनेनंतर विमानातील सर्व प्रवासी आणि वैमानिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं. डीजीसीएने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिलेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *