नवव्या मजल्यावरून पडलेली ‘ही’ महिला दोनदा बचावली!

देव तारी त्याला कोण मारी, असं म्हणतात ना.. ते खरंचा आहे. याचा प्रत्यय येणारी एक घटना चीनमध्ये घडली आहे. इमारतीच्या नवव्या मजल्यावरून पडून एक महिला सुखरूप बचावली आहे.

काय आहे हा प्रकार ?

हॉटेलमध्ये राहायला गेलेली ही महिला हॉटेलच्या गच्चीवरून खाली पडली. पण सुदैवानं ती रस्त्यावर न पडता दुसऱ्या मजल्यावर पडली. तो प्रकार पाहताच रस्त्यावर बघ्यांची गर्दी जमली. दुसऱ्या मजल्यावर पडल्यानंतर उठून उभे राहताना तिचा तोल गेला आणि पुन्हा ती खाली कोसळली. मात्र बिल्डिंगच्या खाली जमलेल्या बघ्यांनी या महिलेला झेललं.

दृश्य कॅमेरात कैद

रस्त्यावर असणाऱ्या बघ्यांनी हे दृश्य कॅमेरात कैद केलं. मृत्यूला हुलकावणी देऊन ती वाचली खरी पण, यात ती गंभीररित्या जखमी झाली असून तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
मात्र हा आत्महत्येचा प्रयत्न होता की ती अनावधानाने पडली का यामागे दुसरेच काही कारण आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *