कॉम्प्युटरचा सर्व्हर डाऊन आणि लग्नाचा मुहूर्त चुकला

आयुष्यातील लग्नाच्या गाठी जोडण्यासाठी मुहूर्त पाहत असतात. मात्र मुहूर्त काढूनही त्या मुहूर्ताच्या वेळेस जर लग्न झालंच नाही तर जोडप्यांबरोबर त्यांच्या नातेवाईकांनाही फटका बसतो. अशीच काही अवस्था गेल्या दोन दिवसांपासून ठाण्यातील विवाह नोंदणी कार्यालयात पाहायला मिळत आहेत.

जोडप्यांसह नातेवाईकांचाही हिरमोड

लग्नसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या जोडप्यांचा लग्नाचा मुहूर्त चुकण्याच्या ब-याच घटना गेल्या दोन दिवसांपासून या कार्यालयात घडत आहेत. नोंदणी करणाऱ्या कॉम्प्युटरचा सर्व्हर डाऊन झाल्याने जोडप्यांसह नातेवाईकांचाही हिरमोड होत आहे.

 संतप्त नागरिकांचा घेराव

या सगळ्या प्रकारामुळे संतप्त नागरिकांनी अधिका-यांना घेराव घालून या प्रकरणी जाब विचारला. त्यावेळी लवकरच यंत्रणा दुरुस्त होईल अशी ग्वाही देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *