ग्रीक वृत्तपत्रे बंद पडण्याच्या मार्गावर

बँका बंद पडल्याने आणि अर्थव्यवस्था गोठत चालल्याने लेस्वोस बेटावरील दैनिक ‘एम्प्रोस‘सारखी काही ग्रीक वर्तमानपत्रांना कागदाचा तुटवडा भासू लागला असून, बँका पुन्हा सुरू होईपर्यंत ही वर्तमानपत्रे बंद करणे भाग पडू शकते.

एम्प्रोस हे लेस्वोसमधील सर्वाधिक खप असलेल्या वर्तमानपत्राने यापूर्वीच आपल्या अंकातील पानांची संख्या 20 वरून 16 पानांपर्यंत कमी केली आहे. देशाची अवस्था बिकट झाल्याने पानांची संख्या आणखी कमी करावी लागू नये, अशी आशा या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोलिस मनोलास यांनी व्यक्त केली. मागील दोन आठवड्यांपासून भांडवली नियंत्रण आणण्यात आल्याने ग्रीक बँका बंद करण्यात आल्या आहेत.

‘कागदाच्या पुरवठ्याची समस्या निश्चितच आहे. सीमाशुल्कामध्ये अडकून पडल्याने आमचे पुरवठादार कागदांचा पुरेसा पुरवठा करू शकत नाहीत. बँकांचे व्यवहार ठप्प असल्याने ते विदेशी पुरवठादारांना पैसे देऊ शकत नाहीत, आणि काम चालू ठेवण्यासाठी रोख रक्कम खूप कमी आहे,‘ असे मनोलास यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *