एका कंपनीकडून गरीब नागरिकांना मोफत कपडे वाटत असताना झालेल्या चेंगराचेंगरीत 23 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती पोलिसांनी आज (शुक्रवार) दिली.
पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील उत्तर भागातील एका कंपनीच्या आवारामध्ये गरीब नागरिकांना कपडे वाटप सुरू होती. कंपनीच्या छोट्या प्रवेशद्वारामधून नागरिक रांगेमधून पुढे जात होते. यावेळी एकदम गर्दी उसळून चेंगराचेंगरी झाली. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत 23 जणांचा मृत्यू झाला आहे. शिवाय, शंभराहून अधिकजण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
‘मृत्यूमुखी पडलेले सर्वजण गरीब नागरिक आहेत. मृतांमध्ये महिलांचा मोठा समावेश आहे. कंपनीच्या मालकासह अन्य सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे,‘ अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकारी कमरूल इस्लाम यांनी दिली.
दरम्यान, स्थानिक प्रसारमाध्यमांनी हे वृत्त प्रसारित केले आहे. कंपनीच्या प्रवेशद्वाराजवळ मोठ्या प्रमाणात चपलांचा खच साचला आहे. पहाटेपासूनच नागरिकांनी रांगा केल्या होत्या.
