वेश्या व्यवसायाला कायदेशीर मान्यता द्यावी, अशी मागणी हरियाना राज्य महिला आयोगाच्या उपाध्यक्षा सुमन दहिया यांनी थेट पंतप्रधान कार्यालयाकडे केली आहे.
दहिया यांनी याबाबत पंतप्रधान कार्यालयाला पत्र पाठवून ही मागणी केली आहे. तसेच, त्यांनी आपल्या मागणीचं जोरदार समर्थनही केलं आहे. त्यासाठी त्यांनी पंतप्रधान कार्यालयाबरोबरच हरियानाचे राज्यपाल कप्तान सिंह सोळंकी, मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर व राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षांनाही पत्र लिहिलं आहे.
महिलांवर होणारे बलात्कार, पोलिसांचा त्रास असे मुद्देही दहिया यांनी ठळकपणे उपस्थित केले आहेत. वरील सर्व पदाधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात वेश्या व्यवसायाला कायदेशीर मान्यता देण्याची मागणी त्यांनी केली आहे.
