ज्यांच्याकडे स्वतःची कार त्यांची घरगुती गॅस सबसिडी होणार रद्द

सरकार आता लवकरच गॅस सबसिडीबाबत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.

आरटीओंमधून होतेय माहिती गोळा

ज्यांच्याकडे स्वतःची कार आहे त्यांची घरगुती गॅस सिंलेंडरवरची सबसिडी रद्द होण्याची शक्यता आहे. सरकारनं प्रायोगिक तत्वावर त्यासाठी निवडक आरटीओंमधून माहिती गोळा करायला सुरुवात केली आहे. देशात असे अनेक नागरिक आहेत ज्यांच्याकडे दोन ते तीन कार आहेत आणि ते गॅसची सबसिडी घेतात. अशा व्यक्तींची माहिती काढून त्यांची सबसिडी येत्या काळात बंद करण्याचा सरकार विचार करत आहे.

श्रीमंतांच्या सरकारी अनुदानाला कात्री

घरगुती गॅसची सबसिडी आधारक्रमांकाशी जोडली गेल्यानं सरकारी तिजोरीवरचा जवळपास 30 हजार कोटींचा बोजा कमी झाला आहे. आता श्रीमंतांना मिळणाऱ्या सरकारी अनुदानालाही कात्री लावण्याचा सरकारचा मानस आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *