नाशिकमध्ये गुन्हेगारीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहे. अगदी क्षुल्लक कारणावरून खून होण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. त्याचीच प्रचिती आज पुन्हा एकदा आली.
शौचालयाला जाण्याच्या नंबरवरून झालेल्या वादातून थेट हत्या करण्यात आली आहे. नाशिकच्या फुलेनगर परिसरात ही धक्कादायक घटना घडली.
योगेश कुयते असं हत्या झालेल्या तरूणाचं नाव आहे.
योगेश आणि त्याच्या शेजाऱ्याचा शौचालयाला जाण्याच्या नंबरवरून वाद झाला. या वादातूनच शेजाऱ्याने योगेशची थेट हत्या केल्याचा आरोप आहे. सकाळी आठच्या सुमारास ही घटना घडली.
याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. धक्कादायक म्हणजे गेल्या दोन दिवसातील ही दुसरी हत्येची घटना आहे.

