मुंबईमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

ओखी वादळाचा तडाखा आता कोकणच्या किनारपट्टीला बसण्यास सुरूवात झाली आहे. दरम्यान मुंबई, रायगड परिसरात जोरदार पावसाला सुरूवात झाली आहे.

सोसाट्याच्या वाऱ्यासह अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.

पुढचे तीन दिवस मुंबईत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

शिवाय समुद्रात सुमारे पाच ते साडे पाच मीटरच्या लाटा उसतील.

त्यामुळे चक्रीवादळ, पाऊस आणि भरतीची वेळ एकत्र जुळून आल्यास मुंबईकरांच्या त्रासात वाढ होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *