शोभा डेने ‘पद्मावती’ सिनेमाची उडवली खिल्ली

कॉन्ट्रोवर्सी क्विन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शोभा डे यांनी नव्या वादाची ठिणगी पेटवली आहे.

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावती’ या सिनेमाच्या प्रदर्शनाच्या वादात लेखिका शोभा डे यांनी उडी घेतली आहे. पद्मावती या सिनेमाला होताना विरोध पाहता शोभा डे यांनी एक ट्विट केलं आहे. हे ट्विट पद्मावती या सिनेमाची खिल्ली उडवणारी आहे.
या ट्विटमुळे पुन्हा एकदा शोभा डे आणि पद्मावती हा सिनेमा चर्चेत आला आहे.

द्मावती हा सिनेमावर शोभा डे यांनी ट्विट केलं आहे.  यामध्ये फक्त Waiting असं लिहिलं असून Padmavati च्या ऐवजी Sadmavati असं लिहीलं आहे. पद्मावतीच्या ओरिजनल पोस्टरमध्ये दीपिका पदुकोण पद्मावतीच्या रूपात हात जोडून उभी असताना दिसते आणि आता शोभा डे यांनी Padmavati च्या जागी Sadmavati असं लिहीलं असून दीपिकाच्या जागी निरूपा राय यांच्या फोटो लावण्यात आला आहे. आपल्याला माहितच आहे की निरूपा राय यांनी हिंदी सिनेमातील अजरामर आईची भूमिका साकारली आहे. पण कायम त्या दुःखी एक ‘सॅड मदर’ म्हणून प्रेक्षकांच्या समोर आल्या आहेत. अशा पद्धतीचं हे ट्विट केलेलं आहे.

पद्मावतीला विरोध 

पद्मावती या सिनेमाच्या प्रदर्शनावरून वाद सुरूच आहे. अनेक राज्यात या सिनेमाच्या प्रदर्शनाला विरोध होत आहे. हा सिनेमा रिलीज अगोदरच अडकला आहे तसेच राजस्थानच्या करणी सेनेनं सिनेमाला तीव्र विरोध दर्शवत पद्मावती सिनेमावर बंदी आणण्याची मागणी केली आहे. वाढता विरोध पाहता सिनेमाचं प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे.

तसेच सिनेमाला आतापर्यंत सेन्सॉर बोर्डकडूनही हिरवा कंदील दाखवण्यात आलेला नाही. निर्मात्यांनी सिनेमाच्या प्रदर्शनाची नवीन तारीखदेखील जाहीर केलेली नाही. यामुळे सिनेमा पाहण्यासाठी उत्सुक असलेल्या रसिकांची निराशा झाली आहे. तसेच आता या ट्विटवर दिग्दर्शक संजय लीला भन्साळी उत्तर देणार का? याकडे साऱ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *