भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यात आज भेट होत आहे. या भेटीचे अमेरिकेकडून स्वागत करण्यात येत आहे.
भारत आणि पाकिस्तानच्या नेत्यांदरम्यान होत असलेल्या या बैठकीचे आम्ही स्वागत करतो. असे राज्य विभाग प्रवक्ते जॉन किरबाय यांनी सांगितले. तसेच दोन्ही देशांदरम्यानचे तणाव कमी करण्यासाठी जो काही निर्णय होईल त्याचे आम्ही स्वागत करतो असे जॉन म्हणाले.
आम्हाल या दोनही देशांमधील तणाव कमी झालेला हवाय. द्विपक्षीय चर्चेतूनहा मुद्दा सोडवला गेल्याचे आम्हाला पाहायचे आहे. दोन्ही देशांना शांतता हवीय त्याचप्रमाणे अमेरिकेलाही हेच हवे आहे असे किरबाय म्हणाले.

