पुण्यातल्या मंडई गणपती मंदिरातील चोराला अखेर बेड्या ठोकल्या मात्र आता ह्या चोरीला वेगळं वळण मिळण्याची शक्यता आहे. कारण काल गणपती मंदिरातील दागिने चोरल्यानंतर तानाजी कुंडलेनं आज पुणे सत्र न्यायालयात नळ चोरण्याचा प्रयत्न केला.
नळ चोरी करत असतानाच तेथील पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. त्यानंतर हा तोच चोर होता ज्याने काल गणपती मंदिरातून चोरी केल्याचे समोर आलं.
पुण्यातल्या मंडई गणपती मंदिरातून काल 50 लाखांचं सोनं चोरी गेलं आरोपीच्या वडिलांनी प्रामाणिकपणा दाखवत कोथरूड पोलीस ठाण्यात चोरी गेलेलं सोनं परत आणून दिलं.. त्यानंतर आरोपीचा शोध सुरु झाला.
मात्र, तो पुणे सत्र न्यायालयात प्लबिंगचं काम करत होता. त्यावेळी नळ चोरला तिथल्या लोकांना संशय आल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे.

