चोराच्या वडिलांचा प्रामाणिकपणा, मंडई गणपती मंदिरातून चोरलेलं सोनं परत

चोराच्या वडिलांचा प्रामाणिकपणा, मंडई गणपती मंदिरातून चोरलेलं सोनं परत

पुण्यातील मंडई गणपती मंदिरातून झालेल्या 50 लाखांच्या सोनं चोरीचा छडा लागला आहे. विशेष म्हणजे आरोपीच्या वडिलांनी प्रामाणिकपणा दाखवत कोथरुड पोलिस ठाण्यात चोरी गेलेलं अर्ध सोनं परत आणून दिलं.

दरम्यान, आरोपी तानाजी कुंडले यालाही पकडण्यात यश आलं आहे आणि त्याच्याकडून 9 तोळे सोनं ताब्यात घेण्यात आलं आहे.

पुण्यातील मंडईमधील शारदा गणपती मंदिरातून काल पहाटे साडे पाचच्या सुमारास चोरी झाली होती. चोरट्याची करामत सीसीटीव्हीत कैद झाली होती.

दागिने चोरणारा विजय कुंडले हा दारुच्या नशेत होता. चोरलेले दागिने अंगावर घालूनच तो रात्री 10 वाजता घरी पोहोचला. त्याच्या वडिलांनी दार उघडलं आणि त्याला पाहून चक्रावून गेले. त्यांनी त्याच्या अंगावरचे दागिने काढून घेतले आणि त्याला कोंडून ठेवण्याचा प्रयत्न केला.

परंतु विजय कुंडले चोरलेल्या दागिन्यांपैकी अर्धे दागिने घेऊन पळून गेला होता. त्यामुळे पोलिसांना अर्धेच दागिने सापडले आहेत. आरोपीच्या वडिलांनी आज कोथरुड पोलिस ठाण्यात सोन्याचा मुद्देमाल जमा केला. त्याने चोरलेल्या आणखी दागिन्यांचा शोध सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *