रशियामध्ये सेल्फी काढण्याच्या नादात एका तरुणीनं आपला जीव गमावल्याची घटना घडलीय. एका पुलावरून ४० फूट खाली पडून तिचा मृत्यू झाला.
अॅना क्रुपेयनिकोवा आपल्या मित्रांसोबत मॉस्कोला फिरायला गेली होती. तेव्हा तिनं सेल्फी काढण्यासाठी पुलावरील रेलिंगचा सपोर्ट घेतला. मात्र रेलिंग घसरली आणि ती ४० फुट दरीस कोसळली.
अॅना आपल्या मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी तिथं पोहोचली होती आणि आपल्या मित्रांसह बसन प्रवास करत होती. तेव्हा रशियाच्या राजधानीतील फोटो काढण्यासाठी हे लोक पुलाजवळ थांबले. मात्र सेल्फी काढण्यासाठी अॅना आपल्या ग्रृपपासून जरा दूर गेली आणि आपला जीव गमावला.

