वर्गात ‘डुलकी’ काढणारा शिक्षक झाला डिस्टर्ब; विद्यार्थीनीला चोपलं!

वर्गात झोपलेल्या शिक्षकाची झोपमोड झाल्याने दुसरीत शिकणाऱ्या ७ वर्षांच्या विद्यार्थीनीला शिक्षकानं कानफडात मारलंय.

पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यात ही घटना घडलीय. सानिका माळवदे असं विद्यार्थीनीचं नाव आहे. शिक्षकानं मारल्यामुळे विद्यार्थीनीच्या गालावर आणि कानाला गंभीर दुखापत झालीय. सानिकावर सरकारी दवाखान्यात उपचार सुरु आहेत.

शिरूर तालुक्यातील माळवदे वस्ती येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत हा प्रकार घडलाय.

दरम्यान, शिक्षक संजय बागलेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी ग्रामस्थांनी केलीय. शिक्षकावर कारवाई झाली नाही तर शाळेला टाळे ठोकण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *