बीसीजीची लस दिल्यानंतर दोन दिवसाच्या बाळाचा मृत्यू झाल्याची घटना गोंदिया जिल्ह्यात घडलीय.
यामुळे, संतापलेल्या नातेवाईकांनी आरोग्य कर्मचार्यांना मारहाण केली असून बाळाच्या मृत्यूस आरोग्य कर्मचारीच जबाबदार असल्याची तक्रार पालकांनी रावणवाडी पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली आहे. गोंदिया जिल्यातील चंगेरा गावात ही घटना घडलीय.
चंगेरा येथील जमील बेग मिर्झा यांनी आपल्या बाळाला अंगणवाडीत लस देण्यासाठी नेले होते. बीसीजीचा टिका लावल्यानंतर त्याला घरी नेण्यात आले. त्यानंतर बाळाची प्रकृती बिघडली. यानंतर संबधित डॉक्टरने बाळाला बाई गंगाबाई रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. मात्र, नातेवाईकांनी मध्यप्रदेशच्या रजेगाव येथील दवाखान्यात नेले. मात्र तोपर्यंत बाळाचे शरीर निळे पडले होते… हॉस्पीटलमध्ये बाळाचा मृत्यू झाल्याचं घोषित करण्यात आलं.

