ठाण्यात रुग्णांसाठी जनावरांच्या औषधांचा वापर

जनावरांच्या औषधांवरील लेबल बदलून ती रुग्णांना विकण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यात उघडकीस आला आहे. या प्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) संबंधित मेडिकलचा परवाना रद्द केला असून तशी नोटीसही पाठवली आहे. तसेच मेडिकल आणि फार्मासिस्टविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

ठाण्यातील ‘लाइफकेअर मेडिको’मधून जनावरांची औषधे आणि इंजेक्शन रुग्णांना विकण्यात येत असल्याचे तपासणीत आढळून आल्यानंतर नोटीस बजावण्यात आली आहे. संबंधित मेडिकल स्टोअरचा परवाना रद्द करण्यात येणार आहे, अशी माहिती सहायक आयुक्त (औषध) गिरीश हुकरे यांनी दिली.

अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी २४ ऑक्टोबरला ‘लाइफकेअर मेडिको’त तपासणी केली. त्यात ८२ औषधांवर चुकीचे लेबल लावण्यात आल्याचे आढळून आले. औषधांच्या रॅपरवरील लेबलवर मानवी वापरासाठी, तर वरील लेबलवर जनावरांच्या वापरासाठी हे औषध असून ते रुग्णांसाठी वापरता येणार नाही, असा स्पष्ट उल्लेख करण्यात आल्याचे दिसून आले. ठाण्यातील विविध औषध वितरकांकडून जवळपास अशा प्रकारची ३ हजार औषधे जप्त करण्यात आली आहेत, अशी माहिती हुकरे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *