येवल्यात भंगार दुकानाला आग, लाखोंचे नुकसान

येवला शहरामध्ये पहाटे पाचच्या सुमारास भरवस्तीत असलेल्या भंगार दुकानास आग लागून लाखों रुपयांचा माल भस्मसात झाला.

आगीचे स्वरुप भयाण असल्याने येवला नगरपालिकेच्या दोन बंबासह स्थानिक रहिवाश्यांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले, आग विझवण्यासाठी मनमाड नगरपालिकेच्या अग्नीशमक दलालाही पाचारण करण्यात आले.

तीन अग्निशमक बंबाच्या अडीच तासाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर सकाळी साडेसातच्या दरम्यान आगीवर नियंत्रण मिळवता आलं. भरवस्तीत लागलेल्या आगीमध्ये आसपासच्या घराचेंही नुकसान झाले आहे.

काही दुचाकीही जळून खाक झाल्या आहेत. सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नसून आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *