पूर्ववैमनस्यातून बोलेरो वाहन थेट घरावर चढवून सरपंचाच्या ७० वर्षीय आईला चिरडल्याची घटना बार्शीटाकळी तालुक्यातील जांबवसू येथे घडली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या मनाबाई मकरम जाधव यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
जांबवसू येथे जमिनीच्या वादातून दोन गटांमध्ये मागील अनेक वर्षांपासून वैमनस्य आहे. पोळ्याच्या दिवशीही या दोन गटांत किरकोळ वाद झाला. दोन्ही गट आमनेसामने आल्याने बार्शीटाकळी पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली. याच वादाचा राग मनात धरून एका बोलेरोचालकाने वाहन थेट मनाबाई यांच्या घरावर चढवून पाडले. त्यानंतरही चालकाने वाहन मागे-पुढे करत घराचे मोठे नुकसान केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
या दरम्यान अंगावर भिंत कोसळून तसेच वाहनाखाली चिरडून मनाबाई गंभीर जखमी झाल्या. उपचारासाठी नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. घटना घडत असताना गावकऱ्यांनी वाहनचालकाला थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र चालकाने बेदरकारपणे वाहन चालविल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. अखेर काही ग्रामस्थांनी दगड-विटांचा मारा करून वाहन थांबविण्याचा प्रयत्न केला.
प्रॉपर्टीच्या खरेदी-विक्रीच्या पैशांवरून सुरू असलेल्या वादाला गुरुवारी मध्यरात्री हिंसक वळण लागले. बेलतरोडीतील गोटाळ-पांजरी परिसरात दोन गटांमध्ये वाद झाला. या वादातून दोघांवर गोळीबार करण्यात आला. यात कार्तिक पुरुषोत्तम धार्मिक आणि शैलेश हिरामण गुल्हाणे जखमी झाले असून, त्यांच्यावर एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणात बेलतरोडी पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या पथकाने सर्व सात आरोपींना अटक केली.
