कोपर्डी बलात्कार: आरोपीच्या वकिलाला धमकी

महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या कोपर्डी बलात्कार व खून खटल्यातील आरोपी नितीन भैलुमे याचे वकील प्रकाश आहेर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी संगमनेर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

कोपर्डीत शाळकरी मुलीवर झालेल्या बलात्कारानंतर महाराष्ट्रभरात संताप आहे. या प्रकरणातील दोषींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी सर्वच स्तरांतून होत आहे. या मागणीसाठी राज्यांत लाखा-लाखांचे मोर्चेही काढण्यात आले होते. त्यामुळं हे प्रकरण अधिकच संवेदनशील बनलं आहे. अशा परिस्थितीत काल दोषींच्या शिक्षेबाबतच्या सुनावणीला सुरुवात झाली. यावेळी बलात्काराचा एक आरोपी नितीन भैलुमे याला कमीत कमी शिक्षा देण्याची मागणी त्याचे वकील प्रकाश आहेर यांनी केली होती.

आहेर यांच्या या युक्तिवादानंतर त्यांना फोनवरून धमकी देण्यात आली आहे. पुन्हा कोर्टात जाऊन आरोपीला फाशी द्यावी असा युक्तिवाद करा, अन्यथा संपवून टाकू, असं त्यांना धमकावण्यात आलं. आहेर यांनी पोलीस तक्रारीत तसं नमूद केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *