जळगावात ट्रक अपघातात ६ बैलांचा मृत्यू

जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील खानापूर गावाजवळ जनावरांची वाहतूक करणारा ट्रक 40 फुटाच्या उंचीवरून खाली कोसळला.

या अपघातात सहा बैलांचा जागीच मृत्यू झाला. तर 7 बैल गंभीर जखमी झाले. रेल्वे उड्डाण पुलावर हा अपघात झाला. मात्र, रेल्वे रुळापासून दूर अंतरावर हा ट्रक खाली कोसळलल्यानं कोणतीही अडचण रेल्वे वाहतुकीवर आली नाही.

ट्रकमध्ये 49 बैल होते. अपघातानंतर ट्रक चालक आणि क्लिनर फरार झालाय. हा ट्रक मध्येप्रदेशातून रावेरकडे येत होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *